BUDGET: डिजिटल कौशल्य विकासासाठी सरकारचा मोठा उपक्रम

89 0

देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (NIRMAlA SITARAM) यांनी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मध्ये शिक्षण आणि कौशल्यविकासाला (चालना देणारी महत्त्वाची घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पात देशभरातील 15,000 शाळांमध्ये “कंटेंट क्रिएटर लॅब्स” सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

या लॅब्समुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता, सर्जनशील विचार आणि ऑनलाइन कंटेंट निर्मितीची क्षमता विकसित होण्यास मदत होणार आहे. Indian Institute of Creative Technologies यांच्या सहकार्याने या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार असून, विद्यार्थ्यांना अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल.

बजेट भाषणात अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले की, या लॅब्सच्या माध्यमातून यूट्यूब ( YOU TUBE), सोशल(SOCIAL MEDIA) मीडिया आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्ससाठी कंटेंट तयार करणाऱ्या तरुणांना व्यावसायिक दर्जाची कौशल्ये आत्मसात करता येतील. त्यामुळे भविष्यात रोजगाराच्या संधी वाढण्यासोबतच उद्योजकतेलाही चालना मिळेल.

Share This News
error: Content is protected !!