sunetra pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय; सुनेत्रा पवार यांची गटनेते पदी निवड

99 0

राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (AJIT PAWAR)यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या जागी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा(SUNETRA PAWAR)पवार स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्या आज सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री(DCM) पदाची शपथ घेणार आहेत.

शनिवारी दुपारी दोन वाजता सुनेत्रा पवार (SUNETRA PAWAR)विधानभवनात दाखल झाल्या. यावेळी बैठकीपूर्वी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर गटनेता (GROUP LEADER)निवडीची प्रक्रिया उपस्थित आमदारांना समजावून सांगण्यात आली. या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार (SUNETRA PAWAR) यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर छगन भुजबळ(CHAGAN BUJBAL)यांनी त्यास अनुमोदन दिले.

दुपारी अडीच वाजता सुनेत्रा पवार (SUNETRA PAWAR)यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,(SUNIL TATKARE)राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल (PRAFULL PATEL) यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.

यावेळी अनिल पाटील(ANIL PATIL)यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत हा निर्णय काळाची गरज आहे. गटनेत्याची निवड आमदारांकडून केली जाते आणि सर्वांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार (SHARAD PAWAR)यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे संभाव्य विलिनीकरण होणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. दोन्ही गटांतील नेत्यांनी याबाबत आपापल्या भावना व्यक्त केल्या असून, शरद पवार यांनीही अशा चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

Share This News
error: Content is protected !!