AMRAVATI

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू; डफरीन आणि इर्विन रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात

66 0

अमरावती(AMRAVATI)जिल्ह्यातील सरकारी आरोग्य यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय डफरीनDUFFERIN) आणि जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विन(IRWIN)येथील डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे एका तरुण विवाहित महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. पल्लवी भूषण गुडधे (रा. खारतळेगाव)(PALLAVI GUDHDE) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी पल्लवी गुडधे यांना कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात आलेल्या तपासणीत त्या गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच दिवशी त्यांचा गर्भपात केला.

विश्रांती न देताच दुसरी शस्त्रक्रिया

कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, गर्भपातानंतर शरीराला आवश्यक असलेली विश्रांती न देता, अवघ्या दोन दिवसांतच डॉक्टरांनी कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचा घाईघाईने निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेदरम्यान पल्लवी यांना अ‍ॅनेस्थेशियाचे भूल इंजेक्शन देण्यात आले. मात्र, शस्त्रक्रिया होताच त्यांची प्रकृती कमालीची बिघडली. डॉक्टरांनी त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात इर्विन हलवण्यास सांगितले.

या घटनेनंतर गुडधे कुटुंबीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पती भूषण गुडधे यांनी गाडगे नगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, डफरीन आणि इर्विन रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी केली आहे.
आता या प्रकरणात आरोग्य विभाग चौकशी करणार का? आणि पोलीस दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This News
error: Content is protected !!