SANJAY RAUT

KDMC: मध्ये मनसे आणि शिंदेसेनेच्या युतीमुळे केडीएमसीत राजकीय वाद; संजय राऊतांची जोरदार टीका

103 0

कल्याण-डोंबिवली महापालिकेत(KDMC)महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने(MNS) एकनाथ शिंदे(EKNATH SHINDE)  यांच्या शिवसेनेसह हातमिळवणी केल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. निवडणुकीत विरोधात लढल्यानंतर सत्तास्थापनेसाठी युती केल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(SANJAY RAUT) यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. शह कटशहाच्या राजकारणात नीतीमत्ता वाहून जाऊ नये, असे विधान करत त्यांनी या युतीवर टीका केली. अस्थिरता असेल तिथे भाजपसोबत जाण्याचा विचार होऊ शकतो, मात्र शिंदेसेनेसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असा स्पष्ट पवित्रा राऊतांनी मांडला.

राऊत(SANJAY RAUT) म्हणाले की, कल्याण डोंबिवलीतील(KDMC) हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला असून तो मनसेची(MNS) अधिकृत भूमिका नाही. तसेच हा प्रकार राज ठाकरे (RAJ THACKERAY) यांनाही मान्य नसल्याचा दावा त्यांनी केला. या विषयावर राज ठाकरे(RAJ THACKERAY) यांच्याशी अंतर्गत चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक नेत्यांना युती करायचीच होती, तरी त्यांनी शिंदेसेनेसोबत जाणे टाळायला हवे होते. शिंदेंबाबत आमची भूमिका कायम कडवट आणि कठोर आहे, असे राऊत म्हणाले. भाजप आणि शिंदेसेना एकत्र येऊन सत्तेत येऊ शकतात, त्यात इतर पक्षांनी सहभागी होण्याची गरज नव्हती, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Share This News
error: Content is protected !!