कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) महापौरपदाबाबत मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे(SHIVSENA) गटाचा महापौर(MAYOR) होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. ही माहिती खासदार श्रीकांत शिंदे (SHRIKANT SHINDE)यांनी दिली.
मनसेचे(MNS) पाचही नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या समर्थनात उभे राहिले असून, त्यामुळे कल्याण डोंबिवलीत मनसे शिवसेना शिंदे ( MANASE – SHIVASENA) गटाची युती अस्तित्वात आली आहे. यासोबतच कोकण भवनात ५३ नगरसेवकांसह शिंदे गटाने अधिकृत गट स्थापन केला आहे.
माध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे (SHRIKANT SHINDE) म्हणाले की, कल्याण डोंबिवलीत(KDMC) मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. येथे महायुतीचा महापौर होणार आहे. महापौरपद किंवा इतर पदांबाबत सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही. याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. भाजपला(BJP) बाजूला ठेवण्याचा प्रश्न नाही. रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(EKNATH SHINDE) यांच्यात चर्चा होईल. ठाकरे गट सोबत आला तरी त्यांचे स्वागतच आहे.
महापालिका निवडणुकी त शिवसेना शिंदे गटाचे ५३ नगरसेवक विजयी झाले असून, भाजपचे ५० नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे ११ तर मनसेचे ५ नगरसेवक विजयी झाले आहेत. महापौरपदासाठी ६२ नगरसेवकांचा बहुमताचा आकडा आवश्यक आहे. सध्या शिंदे गट ५३आणि मनसे ५ मिळून एकूण ५८ नगरसेवकांचा पाठिंबा आहे. त्यामुळे अजून चार नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर, कल्याण डोंबिवलीत(KDMC) शिवसेना ठाकरे गटाचे उर्वरित चार नगरसेवक कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.