मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा(BMC)निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमतासह दणदणीत विजय मिळवला आहे. तब्बल २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेना(SHIVASENA) ठाकरे गटाला यावेळी सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. या निवडणुकीत भाजपचे(BJP)८९ उमेदवार विजयी झाले असून, उद्धव ठाकरे (UDHAV THACKERAY) यांच्या शिवसेनेला(SHIVSENA)६५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
निकालानंतर उद्धव ठाकरे(UDHAV THACKERAY) यांनी विजयी उमेदवारांशी संवाद साधत या पराभवावर पहिली प्रतिक्रिया दिली. भाजपवर (BJP) टीका करताना ते म्हणाले, भाजपला(BJP) वाटत असेल तर त्यांनी शिवसेना कागदावर संपवली आहे, पण शिवसेना अजूनही जमिनीवर जिवंत आहे. भाजपाने साम दाम दंड भेद या मार्गांचा वापर करून निवडणूक जिंकली असली, तरी निष्ठा कधीही विकत घेता येत नाही.
शिंदे गटावरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. गद्दारी करून मिळवलेला हा विजय आहे. आपल्याकडे पैसा नसेल, पण आपल्याकडे जी ताकद आहे, तिने विरोधकांना घाम फोडला आहे. ही ताकद एकत्र राहिली पाहिजे, जेणेकरून पुढील पिढीला तुमचा अभिमान वाटेल, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
शेवटी त्यांनी या लढ्याची दिशा स्पष्ट करत सांगितले की, या निवडणुकीतील यश मी मराठी जनतेला समर्पित करतो. ही लढाई इथे संपलेली नाही, ती आता सुरू झाली आहे.