पुणे महानगरपालिका निवडणुकीत (PMC ELECTION)काँग्रेससाठी(CONGRESS) दिलासादायक निकाल लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्यामुळे नाराज झालेल्या प्रशांत जगताप(PRASHANT JAGTAP)यांनी काँग्रेसमध्ये(CONGRESS) प्रवेश केला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विजय मिळवून दिला. या विजयासह पुण्यात काँग्रेसनं आपलं खातं उघडलं आहे.
प्रभाग क्रमांक १८ ड मध्ये ही लढत अत्यंत अटीतटीची ठरली. प्रशांत जगताप(PRASHANT JAGTAP) यांच्या विरोधात भाजपकडून अभिजित शिवरकर(ABHIJEET SHIVARKAR)यांना उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे जगताप आणि शिवरकर यांनी यापूर्वी एकत्र काम केलं होतं. जगताप काँग्रेसमध्ये दाखल होताच अभिजित शिवरकर(ABHIJEET SHIVARKAR) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये(BJP) प्रवेश केला आणि थेट त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली.
या चुरशीच्या लढतीत अखेर प्रशांत जगताप यांनी बाजी मारली. भाजपचे उमेदवार आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे सुपुत्र असलेल्या अभिजित शिवरकर यांना पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे पुण्याच्या राजकारणात नवा संदेश गेला असून काँग्रेससाठी हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे.
प्रशांत जगताप(PRASHANT JAGTAP) यांच्यासोबतच काँग्रेसचे साहिल केदारी(SAHIL KEDARI) यांनीही यश मिळवले असून, भाजपच्या कालिंदी पुंडे आणि कोमल शेंडकर यांनीही विजय मिळवल्याचे प्राथमिक कल सांगत आहेत. मात्र, दुसरीकडे प्रशांत जगताप ( PRASHANT JAGTAP) यांच्या आई रत्नप्रभा जगताप(RATNAPRABHA JAGTAP) यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने जगताप समर्थकांसाठी हा निकाल संमिश्र ठरला आहे.