सध्या राज्यभरात निवडणुकांची धावपळ सुरू असून आज महाराष्ट्राचे लक्ष निकालांकडे लागले आहे. मात्र पुण्यात काही ठिकाणी मतमोजणीदरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
पुण्यातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली आहे. न्यू इंग्लिश स्कूल येथील मतमोजणी केंद्रावर गेल्या एका तासापासून प्रक्रिया ठप्प आहे.
मशीन बदलण्यात आल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या आक्षेपानंतर मतमोजणी अद्याप सुरू झालेली नसून, परिस्थितीवर निवडणूक अधिकाऱ्यांकडून लक्ष दिले जात आहे.