शिवतीर्थावर झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM DEVENDRA FUDNAVIS) यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य करत आक्रमक शैलीत भाष्य केलं. “लाव रे तो व्हिडीओ” असे म्हणत त्यांनी राज ठाकरे(RAJ THACKAREY) आणि उद्धव ठाकरे(UDHAV THACKAREY) यांनी यापूर्वी एकमेकांवर केलेल्या टीकेचे जुने व्हिडीओ भर सभेत दाखवले.
या व्हिडीओंच्या माध्यमातून उत्तर हे ठाकरे बंधूंनीच एकमेकांना दिलं असल्याचं फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) यांनी सांगितलं. “मी कोणाकडून तरी शब्द उधार घेतो आणि म्हणतो – लाव रे तो व्हिडीओ,” असे म्हणत त्यांनी सभेत उपस्थितांना हे व्हिडीओ दाखवत वातावरण तापवलं.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांची आठवण करून देत, “या दोघांनीच एकमेकांची पोलखोल केली आहे. आता सत्य काय आहे, ते तुम्हीच ठरवा,” असं आवाहन फडणवीस यांनी मतदारांना केलं.
या घटनेमुळे शिवतीर्थावरील सभा चांगलीच गाजली असून, राजकीय वर्तुळातही या भाषणाची चर्चा रंगली आहे.