अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिल्या ‘या’ सूचना

314 0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याला विराट सभा घेतली. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी हिंदूत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत 5 जूनला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली.

मात्र राज ठाकरे यांनीच आता मनसेचे पदाधिकाऱ्यांना शांत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पत्र जारी केले आहे. यामध्ये ठाकरे लिहितात, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी. माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत, ते याबाबत बोलतील. इतर कोणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये.”

तसेच “इतर कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेचे भान राखावे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे. जय महाराष्ट्र!” असे म्हणत राज ठाकरे यांनी सर्वच मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कडक सूचना दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!