manoj gharat joins bjp

KDMC ELECTION;ऐन निवडणुकीत राज ठाकरे यांचा कट्टर समर्थक भाजपात

101 0

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका जवळ येत असताना राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. अशातच डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा धक्का बसला आहे. मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत( MANOJ GHARAT) यांनी आपल्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

गेल्या दोन दशकांपासून राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे मनोज घरत(MANOJ GHARAT) यांनी भाजपात (BJP) प्रवेश केल्याने डोंबिवलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनोज घरत हे डोंबिवलीतील मनसेचा प्रमुख चेहरा मानले जात होते.

मात्र, अलीकडील काळात स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी, विशेषतः उद्धव ठाकरे(UDHAV THACKAREY)गटाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचे मतभेद वाढले होते. पॅनलमधील उमेदवारी, प्रचारातील विसंवाद आणि अंतर्गत गोंधळामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला.

 

मनोज घरत यांनी भाजप नेते रविंद्र चव्हाण (RAVINDRA CHAVAN) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. भाजप(BJP) हा राष्ट्रीय पक्ष असून केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी सत्ताधारी पक्षातूनच मिळू शकतो. याच कारणामुळे आणि सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेतल्याचे मनोज घरत यांनी स्पष्ट केले. आपण तिकीटासाठी भाजपात आलो नसून, कार्यकर्त्यांच्या भविष्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, संजय राऊत(SANJAY RAUT)यांनी त्यांच्या पक्षबदलावर टीका केली होती. याला उत्तर देताना मनोज घरत म्हणाले की, एखादा कार्यकर्ताने पक्ष सोडला की त्याच्यावर आरोप करण्याची परंपरा आहे. मात्र, आम्ही अशा टीकेला महत्त्व देत नाही. राज ठाकरे यांच्यासोबत काम करताना अनेक चांगल्या आठवणी राहिल्या असून, आता भाजपमध्ये प्रामाणिक पणे काम करणार असल्याचे सांगितले

 

Share This News
error: Content is protected !!