आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या(BMC) पार्श्वभूमीवर महायुतीने आपला वचननामा जाहीर केला आहे. या वचननाम्यात मुंबईतील महिलांना केंद्रस्थानी ठेवत प्रवास, रोजगार, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील सर्व महिला प्रवाशांना बेस्ट(BEST BUS) बस तिकिटांवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच बसची संख्या ५ हजारांवरून १० हजारांपर्यंत वाढवली जाणार असून बस थांब्यांवर सीसीटीव्ही, डिजिटल डिस्प्ले आणि वाय-फाय सुविधा उपलब्ध केल्या जातील.
‘लाडक्या बहिणीं’ना LADAKYA BAHINI लघुउद्योग सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोळी भगिनींसाठी मासळी बाजारात आधुनिक सुविधा आणि कोल्ड स्टोरेजचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
महापालिकेमार्फत महिलांसाठी गर्भाशय व ब्रेस्ट कॅन्सर रोगाची मोफत तपासणी केली जाईल. तसेच रात्रीच्या वेळी असुरक्षित भागात अधिक प्रकाश व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM DEVENDRA FADNAVIS)यांनी सांगितले की, महिलांना प्रशिक्षण आणि साधनसामग्री देण्यापुढे जात आता थेट आर्थिक मदतीच्या माध्यमातून ‘लाडक्या बहिणींपासून लखपती दीदींपर्यंतचा प्रवास’ घडवण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच महापालिकेच्या कारभारात पारदर्शकतेसाठी बिल्डिंग प्लान मंजुरीत एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.