Top News Marathi Logo
46 0

मुंबईतील राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे(NITESH RANE) यांच्या शासकीय बंगल्याबाहेर बेवारस बॅग आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची तपासणी सुरू आहे. खबरदारी म्हणून घटनास्थळी ये जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या प्रकरणाचा सीसीटीव्ही(CCTV)व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये ब्राऊन रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाचे जॅकेट व पँट घातलेला एक तरुण हातात काळ्या रंगाची ट्रॉली बॅग घेऊन येताना दिसतो. तो नितेश राणे (NITESH RANE) यांच्या बंगल्याजवळ येऊन ती बॅग तिथे ठेवतो आणि नंतर निघून जातो, असे फुटेजमध्ये स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या बॅगसोबत एक चिठ्ठीही आढळून आली आहे. त्यामध्ये, “बॅगमधील बूट आणि कपडे तुम्ही घेऊ शकता,” असे लिहिलेले आहे. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही धोका टाळण्यासाठी बॅगची सखोल तपासणी केली जात आहे .

 

 

Share This News
vaycasino Tipobet
error: Content is protected !!