पुणे शहरात मोफत मेट्रो (PUNE METRO)आणि बस प्रवासाची घोषणा केल्यानंतर निर्माण झालेल्या चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवार(AJIT PAWAR)यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. भाजपकडून(BJP) या निर्णयावर आक्षेप घेतला जात असताना, हा निर्णय पूर्ण विचाराअंती आणि पक्षाच्या धोरणानुसारच घेतल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
अजित पवार(AJIT PAWAR)यांनी पत्रकार परिषदेत या योजनेची सविस्तर माहिती दिली. शहरातील प्रवास सुलभ व्हावा आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
दरम्यान, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (CHANDRAKANT PATIL)यांनी या घोषणेपूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे आवश्यक होते, असे मत व्यक्त केले होते. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “हा माझ्या पक्षाचा जाहीरनामा आहे.” पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक सुधारण्याच्या दृष्टीने हा निर्णय पक्षाच्या धोरणाचा भाग असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भाजपच्या आक्षेपांवर उत्तर देताना, पुणेकरांच्या हितासाठीच हा निर्णय घेतल्याचे अजित पवार(AJIT PAWAR) यांनी पुन्हा सांगितले .