PMC GANESH BIDKAR: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असताना प्रभाग क्रमांक २४ मधील भारतीय जनता पार्टीचे (भाजप)
उमेदवार गणेश बिडकर (PMC GANESH BIDKAR) यांच्यासह तिन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मंगळवार पेठ परिसरातील दाट लोकवस्तीच्या
भागात त्यांनी नागरिकांची भेटीगाठी घेतल्या आणि प्रचाराचा झंजावात सुरू ठेवला.
PMC ELECTION WORLD 24| GANESH BIDKAR: प्रभाग 24 कसबा पेठमध्ये गणेश बिडकरांचा हाऊस टू हाऊस प्रचार
या दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना गणेश बिडकर म्हणाले, “प्रभाग क्रमांक २४ मध्ये निवडणुकीप्रती अतिशय उत्साहाचे वातावरण आहे.
मंगळवार पेठ हा दाट लोकवस्तीचा कष्टकरी लोकांच्या भाग आहे. कोविड काळात आणि
नंतरच्या प्रशासकराज काळात हि भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून या भागातील जनतेची सेवा केली आहे.
यामुळे या भागात भाजपसाठी सकारात्मक वातावरण आहे आणि जनता आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक निवडणुकीत विरोधक असतोच, पण भाजप हा पक्ष नेहमी हात जोडून जनतेच्या समोर विकासाचा मुद्दा घेऊन जाते. “या मुद्द्याला जनता भरभरून प्रतिसाद देत आहे.
याच प्रचारादरम्यान मंगळवार पेठेतील आंबेडकर वस्तीमधील अनेक तरुणांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे मंगळवार पेठेतील आमची ताकद आणखी वाढली असून, खूप चांगले वातावरण तयार झाले आहे असं गणेश बिडकर म्हणाले.”
PMC ELECTION GANESH BIDKAR: गणेश बिडकरांची कल्पना कामी आली, लाईट हाऊसमुळे हजारो हातांना मिळाली रोजगाराची संधी
बिडकर यांनी या भागातील नागरिकांच्या अपेक्षांची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचे सांगताना निश्चितच कामाच्या माध्यमातून आपण न्याय देऊ, असे आश्वासन दिले.
प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल परिसर) हा पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचा गड मानला जात असून. गणेश बिडकर हे भाजपचे अनुभवी नेते या प्रभागातील विकास आणि जनसेवेच्या मुद्द्यांवर जोरदार प्रचार करत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या या प्रचार दौर्यामुळे भाजपला या भागात अधिक मजबूत आधार मिळणार आहे.
PMC GANESH BIDKAR: सामान्य कार्यकर्ता हीच ओळख; २५ वर्षे विश्वासाचं नातं जपणारे गणेश बिडकर