sunetra pawar reacts on mahesh landge statement

MAHESH LANDAGE VS AJIT PAWAR : महेश लांडगेंनी अजितदादांवर एकेरी भाषेत टीका करताच सुनेत्रा पवार संतापल्या ! म्हणाल्या…

470 0

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील(PCMC) राजकीय वातावरण तापले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार(AJIT PAWAR) आणि भाजप आमदार महेश लांडगे(MAHESH LANDGE) यांच्यातील वाद अधिक तीव्र झाला आहे. दोघांमधील शाब्दिक चकमक आता थेट वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचली आहे.

भोसरीचे आमदार महेश लांडगे (MAHESH LANDGE) यांनी एका जाहीर सभेत अजित पवारांच्या जुन्या वक्तव्यांचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली. पवारांची मिमिक्री करत त्यांनी एकेरी भाषेत टोला लगावत त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. तू कार्यक्रम करतो, तर आम्ही काय बांगड्या घातल्यात का? “आता मी तुमच्या वाकड्यात गेलो आहे, पुढे काय होतं ते पाहू,” असे थेट आव्हानही त्यांनी दिले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

या टीकेनंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (SUNETRA PAWAR) यांनी भोसरी मतदारसंघात सक्रिय होत लांडगे यांच्या बालेकिल्ल्यात सलग चार तास बैठका घेतल्या. त्यांनी टीकेवर थेट प्रतिक्रिया देणे टाळले असले तरी, स्थानिक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात जुळवाजुळव करत आपणही मैदानात उतरल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अजित पवार गटाने भोसरीत भाजपविरोधात रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अजित पवार(AJIT PAWAR ) यांनी उपरोधिक शैलीत उत्तर दिले. “महेश लांडगे हे मोठे नेते आहेत. मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचे असते. जसे आपण घरच्या माणसाला ‘पाणी आण’ म्हणतो, तसेच त्यांना मी ‘चिल्लर’ वाटत असेन,” अस प्रतिउत्तर त्यांनी दिला . महायुतीत असतानाही पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार गटामधील हा थेट सामना अधिक धारदार होत चालला आहे.

Share This News
error: Content is protected !!