बदलापूर (BADALAPUR)–कुळगाव(KULGAON) नगरपालिकेत भाजपने (BJP) लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे(TUSHAR AAPTE) याला स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बदलापूरमधील एका शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात तुषार आपटे(TUSHAR AAPTE) सहआरोपी असूनही त्याची नियुक्ती करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे.
या नियुक्तीविरोधात मनसेचे(MNS) ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (AVINASH JADHAV)यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, तातडीने निर्णय मागे न घेतल्यास 13 किंवा 14 जानेवारी रोजी बदलापूरमध्ये मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. आरोपीवर गंभीर आरोप असताना अशी नियुक्ती करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तसेच, आरोपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्यामुळे त्याला संरक्षण दिले जात आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत पाच स्वीकृत नगरसेवकांची घोषणा झाली असून, त्यामध्ये आपटेचा समावेश झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.