BMC ELECTION AMEET SATAM BJP

BMC ELECTION :निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा मोठा निर्णय ; २६ बंडखोर निलंबित.

333 0

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत(MUMBAI MUNCIPAL ELECTION) भाजपने(BJP)शिस्तभंगाची मोठी कारवाई केली आहे. भाजप-शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या २६ बंडखोरांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम(AMEET SATAM) यांनी केली आहे.

१५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने (BJP)शिवसेना(SHIVSENA) आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गट यांच्यासोबत महायुती केली आहे. युतीमुळे काही जागा मित्र पक्षांना देण्यात आल्याने उमेदवारी न मिळालेल्या भाजपच्या काही इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत बंडखोरी केली.

ही बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे नेते आशिष शेलार (ASHISH SHELAR) , प्रवीण दरेकर(PRAVIN DAREKAR) आणि प्रसाद लाड(PRASAD LAD) यांनी संबंधित उमेदवारांशी चर्चा करून त्यांना माघार घेण्याचे आवाहन केले. मात्र, या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर पक्षाने कठोर भूमिका घेत शिस्तभंगाची कारवाई केली.

दरम्यान, पक्षनेत्यांच्या प्रयत्नांमुळे काही बंडखोरांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला असला, तरी माघार घेणाऱ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे .

Share This News
error: Content is protected !!