Santosh Nalawde quits MNS

संतोष धुरी यांच्यानंतर मनसेला आणखी एक धक्का! बाळा नांदगावकरांच्या विश्वासू सहकाऱ्यानं सोडली साथ.

293 0

मुंबई(MUMBAI) महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीनंतरही मनसेच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. उलट, पक्षाला सलग धक्के बसत असून, आता शिवडीतील मनसेचे प्रमुख नेते संतोष नलावडे(SANTOSH NALAWDE) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत(SHIVSENA)प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे मुंबईच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

संतोष धुरी यांच्या पक्षत्यागानंतर मनसेला हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. नलावडे हे मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (BALA NANDGAONKAR)यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. शिवडी(SHIVADI) विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटन मजबूत करण्यामागे त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. विशेषतः गिरणगाव परिसरातील मराठी मतदारांमध्ये मनसेची पकड निर्माण करण्यात त्यांनी दीर्घकाळ काम केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(EKNATH SHINDE) यांनी ठाकरे युतीला उत्तर देण्यासाठी संघटनात्मक पातळीवर हालचाली सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे. आक्रमक आणि प्रभावी स्थानिक नेत्यांना आपल्या गटात सामील करून शिंदे गटाने थेट मैदानात उतरल्याचा दिसत आहे. “वरचे नेते एकत्र आले असले तरी कार्यकर्त्यांचा पाठिंबा आमच्याकडे आहे,” असा राजकीय संकेत या पक्षप्रवेशातून देण्यात आला आहे.दरम्यान, नलावडे यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे शिवडीतील राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!