भाजपची(BJP) सध्याची अवस्था ही पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील(JAYANT PATIL ) यांनी सांगलीत केली. सत्तेसाठी भाजप(BJP) एमआयएम(MIM) आणि काँग्रेससोबतही(CONGRESS) युती करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सांगली (SANGALI)महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत भाजपच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर भाष्य करताना जयंत पाटलांनी (JAYANT PATIL) पिंजरा चित्रपटातील संदर्भ दिला. तमाशा बंद करायला आलेला मास्तरच शेवटी तमाशाचा भाग बनतो, अशी उपमा देत त्यांनी भाजपवर निशाणा साधला .यावेळी शायरीचा आधार घेत जयंत पाटील म्हणाले, “ये बंद करने आए थे तवायफो के कोठे, मगर सिक्कों की खनक देखकर खुद ही मुजरा कर बैठे”या शायरीचा उल्लेख होताच सभेत जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.
भाजपच्या अकोटमधील (AKOT) एमआयएमसोबत आणि अंबरनाथमधील(AMBARNATH) काँग्रेससोबत झालेल्या युतीवर जयंत पाटील म्हणाले की, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारा भाजप सत्तेसाठी तत्त्वांशी तडजोड करत आहे. ज्यांच्यावर भाजप नेहमी टीका करतो, त्यांच्याशीच हातमिळवणी करण्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. “दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
सांगली(SANGALI)शहरातील विकासकामे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच झाली असल्याचा दावा करत, सत्तेच्या आमिषाला न बळी पडता विकास करणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहील, असा विश्वास जयंत पाटील (JAYANT PATIL)यांनी व्यक्त केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगली महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.