Breaking News ! टाटा स्टील कंपनीच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट, तीन कर्मचारी जखमी

385 0

जमशेदपूर- झारखंडमधील जमशेदपूर येथील टाटा स्टील कंपनीच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर प्लांटमध्ये भीषण आग लागली. या आगीत दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी टाटा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी १० वाजून २० मिनिटांनी ही घटना घडली. 

स्फोटानंतर प्लांटमध्ये गॅस लिकेज झाला. त्यामुळे आणखी आग भडकली. त्यामुळे परिसरातील लोकांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या कोक प्लांटमध्ये बंद असलेल्या 6 नंबरच्या बॅटरीमधून स्फोटाचा आवाज आला. सध्या तिला नष्ट करण्याची प्रक्रिया चालू असताना हा स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीमध्ये गोधळ उडाला. यामध्ये तीन कामगार जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लाद निर्मात्याने जमशेदपूरमध्ये जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही कळवू इच्छितो की आज सकाळी 10.20 च्या सुमारास कोक प्लांटमध्ये बनवलेल्या 6 नंबरच्या बॅटरीमधून (टाटा स्टील ब्लास्ट) स्फोटाचा आवाज आला. जमशेदपूर येथे स्थित कारखाना. बॅटरी-6 सध्या कार्यरत नाही आणि ती नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!