PMC ELECTION GANESH BIDKAR:  वस्तीभागातील तरुण मुला-मुलींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख आणि प्रभाग २४ ड चे उमेदवार गणेश बिडकर यांनी राबवलेला ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ हा उपक्रम अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. शिक्षणाअभावी रोजगाराच्या संधींपासून वंचित राहणाऱ्या तरुणांच्या कला-कौशल्यांना दिशा देत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे काम या प्रकल्पातून सुरू आहे.

PMC ELECTION GANESH BIDKAR: गणेश बिडकरांची कल्पना कामी आली, लाईट हाऊसमुळे हजारो हातांना मिळाली रोजगाराची संधी 

410 0

PMC ELECTION GANESH BIDKAR:  वस्तीभागातील तरुण मुला-मुलींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून

त्यांना स्वावलंबी करण्यासाठी पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख आणि प्रभाग २४ ड चे उमेदवार गणेश बिडकर

यांनी राबवलेला ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’

हा उपक्रम अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. शिक्षणाअभावी रोजगाराच्या संधींपासून

वंचित राहणाऱ्या तरुणांच्या कला-कौशल्यांना दिशा देत,

त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे काम या प्रकल्पातून सुरू आहे.

वस्तीभागातील अनेक तरुण-तरुणींना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता येत नाही. मात्र शिक्षण नसले तरी या तरुणांमध्ये

विविध कला, कौशल्य आणि काम करण्याची जिद्द असते. या वास्तवाची जाणीव ठेवून गणेश बिडकर यांनी त्यांच्या कौशल्यांचा विकास करून

रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि इतर तरुणांप्रमाणेच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा,

या उद्देशातूनच २०२१ साली सोमवार पेठेतील भोलागिरी येथील महानगरपालिकेच्या शाळेत ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ची सुरुवात करण्यात केली.

या प्रकल्पाचा मोठा फायदा कसबा पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, गणेश पेठ या

भागांतील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या तरुणांना झाला आहे. वस्तीपातळीवरील तरुण-तरुणींसाठी रोजगारनिर्मिती हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू

असून, १८ ते ३० वयोगटातील तरुणांना एक महिन्याचे सघन प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे तरुणांना

स्वतःची करिअरविषयक स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्याची संधी मिळत असून, स्वतःसह कुटुंबासाठी

उपजीविकेचे साधन निर्माण होत आहे.

२०२१ ते २०२५ या कालावधीत १५०० हून अधिक तरुण-तरुणींनी या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण घेतले असून,

त्यापैकी साडे पाचशेहून अधिक तरुण-तरुणींना प्रत्यक्ष नोकऱ्या मिळाल्या आहेत. हे आकडे या प्रकल्पाच्या यशाची साक्ष देणारे ठरत आहेत.

लाईट हाऊस प्रोजेक्टमध्ये प्रशिक्षण देण्यापूर्वी इच्छुक तरुण-तरुणींची करिअर टेस्ट घेतली जाते.

त्यांच्या आवडी, गुणवत्ता, क्षमता आणि व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून त्यानुसार योग्य क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाते.

या प्रकल्पाअंतर्गत टॅली, कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलरिंग,

ब्युटी पार्लर, हेल्थ सेक्टर, जिम इन्स्ट्रक्टर, नर्सिंग असिस्टंट, कुकिंग, ग्राफिक डिझाईन,

विविध सॉफ्टवेअर लँग्वेजेस यांसह अनेक व्यावसायिक कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते.

PMC GANESH BIDKAR: सामान्य कार्यकर्ता हीच ओळख; २५ वर्षे विश्वासाचं नातं जपणारे गणेश बिडकर 

उच्च दर्जाच्या आणि गरजाधिष्ठित प्रशिक्षणामुळे वस्तीभागातील अनेक तरुणांचे जीवनमान सुधारले आहे.

विशेष म्हणजे या उपक्रमामुळे अनेक तरुण गुन्हेगारी किंवा चुकीच्या मार्गाकडे वळण्यापासून वाचले असून,

मुख्य प्रवाहात येत स्वतःचे करिअर घडवून उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’च्या माध्यमातून तरुणांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण करत,

समाजघडणीचे भक्कम कार्य गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

PMC ELECTION| GANESH BIDKAR: उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गणेश बीडकरांचा प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर ; 60 हजार नागरिकांच्या घेतल्या भेटीगाठी

Share This News
error: Content is protected !!