काँग्रेसमध्ये राहून भाजपसाठी काम? प्रणिती शिंदेंवर गंभीर दावा….

637 0

वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर(SUJAT AMBEDKAR) यांनी काँग्रेस (CONGRESS) खासदार प्रणिती शिंदे  (PRANITI SHINDE)यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक  आरोप केले आहेत. महापालिका निवडणुकांनंतर प्रणिती शिंदे(PRANITI SHINDE) भाजपमध्ये  (BJP)प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केला असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS)यांच्याशी आधीच समजूत झाल्याचे ते म्हणाले.

आमच्या विरोधात भाजप(BJP)  आहे, पण प्रत्यक्षात दोन्ही बाजूंनी भाजपच आहे,” असा आरोप करत त्यांनी म्हटले की, प्रणिती शिंदे(PRANITI SHINDE) या भाजपच्या(BJP) हितासाठी काम करत असल्याचे सर्वांनाच माहिती आहे.

निवडणुकीपूर्वीच प्रणिती शिंदे(PRANITI SHINDE) भाजपमध्ये(BJP) जाणार होत्या. ऑक्टोबरमध्ये प्रवेश ठरला होता. मात्र, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता, फडणवीस यांनी त्यांना काँग्रेसमध्येच थांबून भाजपच्या(BJP) उमेदवारांसाठी ‘सेटिंग’ करण्याचा सल्ला दिला,” असा गंभीर दावा सुजात आंबेडकर(SUJAT AMBEDKAR) यांनी केला.

Share This News
error: Content is protected !!