राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिवसेना(SHIVSENA) पक्षाचे अनेक उमेदवार बिनविरोध विजयी झाले. विरोधकांनी शंका उपस्थित केल्यावर राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission), ही बाब गांभीर्याने घेतली आहे.
आयोगाने प्रभागातील निवडणूक अधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. अहवाल प्राप्त होईपर्यंत बिनविरोध उमेदवारांचे निकाल जाहीर करणार नाहीत, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.
कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि धुळे या महापालिकांसह सत्ताधारी पक्षांचे १६ हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधकांनी सत्ताधारी पक्षांकडून दबाव टाकून विरोधी उमेदवारांना अर्जच दाखल करू दिले नाहीत, असे आरोप केले आहेत, त्यामुळे आयोगाने प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.