सातारा ,दि. ३१: नववर्षाच्या (NEW YEAR) स्वागतासाठी मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेला युवक साताऱ्यातील(SATARA)कास पठाराकडे(KAAS PLATEAU) जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून गंभीर जखमी झाला आहे. रात्रीच्या सुमारास एका हॉटेलजवळ ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या निमित्ताने युवक मित्रांसह कास पठार(KAAS PLATEAU) मार्गावरील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता. मात्र, रात्रीच्या अंधारात हॉटेलजवळ असलेल्या दरीचा अंदाज न आल्याने तो थेट खोल दरीत पडला.
घटनेची माहिती मिळताच छत्रपती शिवेंद्रराजे (SHIVENDRAJE TREKARS)ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचावकार्याद्वारे मोठ्या प्रयत्नांनी युवकाला दरीतून बाहेर काढण्यात आले.
जखमी युवकाचे नाव आदित्य कांबळे (ADITYA KAMBLE)(रा. क्षेत्रमाहुली) असे असून, सध्या त्याच्यावर साताऱ्याच्या(SATARA) जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कास पठार (KAAS PLATEAU)मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.