पुणे , दि .३० : भारतीय जनता पार्टीचे (BJP) माजी नगरसेवक अमोल बालवडकर(AMOL BALWADKAR) यांनी आज अजित पवारांच्या( AJIT PAWAR) नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(NCP) जाहीर प्रवेश केला. प्रवेशानंतर लगेचच राष्ट्रवादीकडून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. या वेळी बालवडकर(BALWADKAR)यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले.
भाजपाने(BJP) दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळेच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे बालवडकर (BALWADKAR) यांनी स्पष्ट केले. “माझ्या कठीण काळात अजित पवारांनी(AJIT PAWAR)माझ्यावर विश्वास ठेवला. तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन,” असे त्यांनी सांगितले.
भाजपवर(BJP)टीका करताना बालवडकर(BALWADKAR) म्हणाले की, भाजप (BJP)असो किंवा कोणताही पक्ष, मोठा व्हायचे असेल तर पाय जमिनीवर ठेवणे आवश्यक आहे. तसेच, “मी आता भाजपाला (BJP) दाखवून देईन की खरा कार्यकर्ता काय असतो.”
आगामी निवडणुकीत भाजपाला(BJP) ‘धोबीपछाड’ देण्याचा दावा करत बालवडकर(BALWADKAR)म्हणाले, हे वचपा काढणे नाही, तर भाजपाने दिलेल्या धोक्याला दिलेले उत्तर आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) यामुळे बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.