CHATRAPATI SAMBHAJINAGAR :भाजपमध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध नवागत’ संघर्ष ;तिकीट वाटपावरून नाराजी

74 0

महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारी वाटपावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये (CHATRAPATI SAMBHAJINAGAR)भाजपमधील(BJP)तीव्र  नाराजी समोर आली आहे. तिकीट वाटपात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करत भाजप(BJP)कार्यकर्त्यांनी पक्षाच्या प्रचार कार्यालयाला बाहेर आंदोलन केलं.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत, पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करूनही संधी नाकारली जात असल्याचा आरोप केला. नुकतेच पक्षात प्रवेश केलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिली जात असल्याने जुने कार्यकर्ते संतप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

प्रभाग क्रमांक २० मधील इच्छुक उमेदवार दिव्या उल्हास मराठे(DIVYA MARATHE) यांनी तिकीट नाकारल्याने प्रचार कार्यालयात स्थानिक नेत्यांना जाब विचारला. अनेक वर्षे पक्षासाठी काम केल्यानंतरही डावलण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली.

दिव्या मराठे(DIVYA MARATHE)यांच्यासह अनेक जुने व निष्ठावंत कार्यकर्ते उमेदवारी नाकारल्यामुळे पक्ष कार्यालयात दाखल झाले.अनुभव नसलेल्या नव्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिल्यामुळे भाजपमध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध नवागत’ असा वाद पुन्हा एकदा उफाळल्याचं स्पष्ट होत आहे. “काम करून पक्षासाठी प्रामाणिक राहून आमच्यावर अन्याय का? ” असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, या नाराजीचा निवडणूक प्रक्रियेवर आणि निकालावर परिणाम होण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!