‘केजीएफ’ चाहत्यांसाठी धक्का ! ‘केजीएफ 2’ सिनेमातील या अभिनेत्याचे निधन

514 0

मुंबई- ‘केजीएफ’ सिनेमाची क्रेझ कायम आहे. प्रत्येक सिनेमागृहात अद्याप हाच सिनेमा चालतो आहे. KGFच्या चाहत्यांसाठी दु;खद बातमी समोर येत आहे. KGF मध्ये छोटासाच पण महत्वाचा रोल करणाऱ्या अभिनेत्याचे निधन झाल्याचे वृत्त हाती आले आहे.

गेल्या 14 एप्रिल 2022 रोजी केजीएफ 2 सिनेमा प्रदर्शित झाला. ‘केजीएफ 1’ प्रमाणे ‘केजीएफ 2’ सिनेमाने आतापर्यत 397.95 करोडची कमाई केली. आता केजीएफ 3 सिनेमा देखील येणार असल्याने प्रेक्षकांना त्याची उत्सुकता लागली आहे.

‘केजीएफ 2’ या सिनेमातील अभिनेता मोहन जुनेजा यांचे आज 7 मे 2022 ला सकाळी निधन झाल्याची बातमी समोर आली. मोहन जुनेजा मोठ्या आजाराचा सामना करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. आज सकाळी बंगळुरूच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अशी माहिती पुढे आली आहे.

मोहन जुनेजा यांनी एक विनोदी कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. केजीएफमध्ये त्यांनी पत्रकार आनंदच्या खबरीची भूमिका केली होती. त्यांनी यापूर्वी अनेक तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्ये काम केलं आहे. आपल्या करिअरमध्ये मोहन यांनी 100 हून अधिक सिनेमे दिले आहेत. ते KGF Chapter 1 आणि KGF Chapter 2 या दोन्ही भागात होते. ‘चेतला’ सिनेमातून अभिनेत्याला सर्वात मोठा ब्रेक मिळाला होता. या सिनेमातील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

मोहन यांच्या जाण्यानंतर त्यांचे चाहते आणि सिनेसृष्टीतील त्यांचे सहकारी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. मोहन यांना लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं. महाविद्यालयीन काळात त्यांनी नाटकांमध्येही भाग घेतला. त्यांनी 2008 मध्ये ‘संगमा’ या रोमँटिक कन्नड सिनेमातून करिअरला सुरुवात केली. याचं दिग्दर्शन रवी वर्मा गुब्बी यांनी केलं होतं.

यानंतर त्यांनी कन्नड- तमिळ चित्रपट ‘टॅक्सी नंबर’मध्ये काम केलं. 2010 मध्ये मोहन यांनी कन्नड भाषेतील ‘नारद विजया’ या नाटकातूनही आपल्या अभिनयाची झलक साऱ्यांना दाखवली. असं असलं तरी मोहन जुंजा हे फक्त कन्नड सिनेमांसाठी ओळखले जातात. 2018 मध्ये त्यांनी ‘निगुडा’ या भयपटातही काम केलं होतं. हा सिनेमाही कन्नड भाषेतच होता. सर्व प्रकारचे सिनेमे करणारे मोहन जुनेजा हे विनोदी अभिनेता म्हणून अधिक ओळखले जायचे.

Share This News
error: Content is protected !!