Top News Marathi Logo

पवार कुटुंबीय एकाच मंचावर… AI सेंटरच्या उद्घाटनाला उद्योगपती अदानी उपस्थित

77 0

विद्या प्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) इमारतीच्या उद्घाटनानिमित्त आज बारामतीत (Baramati) पवार(Pawar) कुटुंबीय एकाच मंचावर आले होते. . या उद्घाटनानिमित्त देशातील ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani)यांचीही उपस्थिती होती.

उद्घाटन समारंभात भाषण करताना गौतम अदानी(Gautam Adani)  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad pawar) यांचे मनापासून कौतुक केले. शरद पवार(Sharad pawar ) हे आपले मार्गदर्शक असल्याचे सांगत त्यांनी बारामतीच्या (Baramati) सर्वांगीण विकासात पवारांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली.

अदानी(Adani) म्हणाले, “पवार साहेबांनी बारामतीला(Baramati) केवळ स्थानिक विकासापुरते मर्यादित न ठेवता कृषी, सहकार, शिक्षण आणि उद्योजकतेला चालना देत ते संपूर्ण देशासाठी आदर्श मॉडेल बनवले आहे. राष्ट्रीय स्तरावरही त्यांनी कृषी धोरण आणि अन्नसुरक्षेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.”

त्याचबरोबर अदानी (Adani)यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सामर्थ्यावर भर दिला. “तंत्रज्ञान नेहमीच नवीन संधी निर्माण करते आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीत AI भारताला अभूतपूर्व प्रगतीकडे घेऊन जाईल. असे ते म्हणाले.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit pawar), सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, खासदार सुप्रिया सुळे(Supriya sule), खासदार सुनेत्रा पवार, राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार , खजिनदार युगेंद्र पवार, नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक मान्यवर उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!