भाजपा 27% ओबीसी उमेदवारांना संधी देणार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा (व्हिडिओ)
मुंबई- राज्यातील ओबीसीचं राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या हलगर्जीपणामुळे गेलं असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपा 27% ओबीसी उमेदवारांना संधी देणार असल्याची मोठी घोषणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते भाजपा ओबीसी मोर्चाच्या बैठकीतून बोलत होते.
फडणवीस म्हणाले राज्यातील ओबीसींचा राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं विश्वासघात केला असून ओबीसीच्या राजकीय आरक्षणाविरोधात महाविकास आघाडी सरकार कोर्टात गेलं असल्याचा घणाघात देखील फडणवीस यांनी यावेळी केला.
