अखेर ठाकरे बंधूंच ठरलं, उद्या संयुक्त पत्रकार परिषदेतून करणार युतीची घोषणा 

89 0

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली ठाकरे बंधूंची युती अखेर प्रत्यक्षात येणार आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या या युतीची घोषणा उद्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे .

शिवसेना (उबाठा) आणि मनसे  यांच्यातील युतीची घोषणा पत्रकार परिषदेत केली जाणार आहे. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली .

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नेत्यांमध्ये जागावाटपावर चर्चा पूर्ण झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. उद्याच्या पत्रकार परिषदेत युतीसोबतच आगामी महापालिका निवडणुकांसाठीची जागावाटपाची रूपरेषाही जाहीर होण्याची शक्यता आहे.

या युतीमुळे मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेना आणि मनसेची ताकद वाढल्याचं स्पष्ट दिसत आहे.

संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसत आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. या फोटोसोबत संजय राऊत यांनी फक्त “उद्या 12 वाजता” असे कॅप्शन दिले आहे. या ट्विटनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!