*लेखक संजय दुधाणेंच्या पुस्तकांचा रौप्यमहोत्सवी विक्रम*
*मेजर ध्यानचंद पुस्तकाने गाठला विक्रमी 25 हजार विक्रीचा पल्ला*
खाशाबा जाधव पुस्तकास 25 वर्ष पूर्ण, मराठीसह हिंदीतून आवृत्ती प्रकाशित
लेखक संजय दुधाणे यांनी यंदा पुस्तक विश्वात रौप्यमहोत्सवी विक्रमाची नोंद केली आहे. पुणे पुस्तक महोत्सवात दुधाणे यांच्या मेजर ध्यानचंदसह खाशाबा जाधव व नीरज चोप्रा पुस्तकास मोठा प्रतिसाद लाभला.
संजय दुधाणेंच्या नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेल्या मेजर ध्यानचंद इंग्रजी चरित्र पुस्तकाने सर्वाधिक खपाचा नवा विक्रम केला आहे. दोन वर्षात पुस्तकाच्या 8 आवृत्या प्रकाशित झाल्या असून तब्बल 25 हजार पुस्ताकांची विक्री झाली आहे. खाशाबा जाधव पुस्तकास यंदा 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे पुस्तकही नॅशनल बुक ट्रस्टने मराठीसह हिंदी भाषेत प्रकाशित केले आहे. पुणे पुस्तक महोत्सवात दुधाणे यांची मराठी, इंग्रजीसह हिंदी भाषेतील पुस्तकांना वाचकांनी प्रतिसाद मिळाला आहे.
पुणे पुस्तक महोत्सवातील लेखक आपल्या भेटीला या उपक्रमात संजय दुधाणे यांना निमंत्रित करण्यात आले होते. पुस्तक महोत्सवात दुधाणे यांच्याशी वाचकांशी भेट घेऊन संवाद साधता आला. पुस्तकावर लेखकाची सही घेण्यासाठी वाचकांनी पसंती दिली. यावेळी पुस्तकाच्या निर्मितीची यशोगाथाही दुधाणे यांनी सांगितली.
मूळात महाराष्ट्रात क्रीडाविषयक लेखक करणारे लेखक दुर्मिळ आहे, त्यात क्रीडा पुस्तक प्रकाशित करणारे प्रकाशकही फारसे उपलब्ध नसताना संजय दुधाणे यांच्या पुस्तकाचे देशात कौतुक होत आहे. नॅशनल बुक ट्रस्टने 2023 मध्ये मेजर ध्यानचंद यांचे चरित्र सर्वप्रथम प्रकाशित केले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नॅशनल बुक ट्रस्टने इंडिया 75 या शिर्षकाअंतर्गत देशासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 75 महान व्यक्तिमत्वाची निवड केली होती. यात दुधाणे यांच्या मेजर ध्यानचंद चरित्र पुस्तकाचा समावेश करण्यात आला.
2023 मध्ये नॅशनल बुक ट्रस्टकडून ओरीसा, मध्यप्रदेश, जम्मू-काश्मिर, राजस्थान, बिहार येथील राज्य शासनाने अभ्यासक्रमासाठी मेजर ध्यानंचद चरित्र पुस्तकांची खरेदी केली. तसेच नॅशनल बुक ट्रस्टच्या दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय बुक महोत्सवातही या पुस्तकाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंंत 25 हजार पेक्षा अधिक प्रति मेजर ध्यानचंद पुस्तकाच्या खरेदी केल्या गेल्या आहेत.
पॅरीस ऑलिम्पिक निमित्ताने सकाळ प्रकाशनाकडूनही संजय दुधाणे लिखित ऑलिम्पिक चॅम्पीयन नीरज चोप्रा पुस्तक प्रकाशित करण्यात आले. मराठीसह इंग्रजीतूनही हे पुस्तक सकाळने प्रकाशित केले आहे. या पुस्तकालाही ॲमेझॉनकडून बेस्ट सेलरचा टॅग मिळाला आहे. सर्वाधिक पुस्तक विक्रीसह तीन भाषेतील चरित्र पुस्तकाचे दुधाणे हे देशातील पहिलेच क्रीडा लेखक ठरले आहेत.