महिंद्राच्या नवीन स्कॉर्पिओचा टिझर पाहिलात का ? त्या टीझरला आवाज कोणाचा आहे ओळखा पाहू !

307 0

महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ म्हणजे एकदम रांगडी गाडी. ही गाडी चालवणारी व्यक्ती सुद्धा तेवढीच रांगडी पैलवान असली तर मस्तच. आता नवीन स्कॉर्पिओ बाजारात येऊ घातली आहे. या गाडीकडे तमाम वाहनप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

याच गाडीचा एक टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये आवाज आहे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा. हा टीझर अलीकडेच महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

त्याचे झाले असे की, आनंद महिंद्रा यांना एका नेटकऱ्याने ट्विटरवरून प्रश्न केला की नवी स्कॉर्पिओ कधी लॉन्च होणार ? आम्ही तिची आतुरतेने वाट पाहात आहे. त्यावर आनंद महिंद्रा यांनी त्याला गमतीदार उत्तर दिले आहे. आनंद महिंद्रा म्हणाले, ” मी जर याचं उत्तर दिलं तर मला नोकरीवरून काढून टाकले जाईल. पण इतकंच सांगू शकतो की मी तुमच्या इतकाच या लॉन्चसाठी उत्सुक आहे”

Share This News
error: Content is protected !!