MANIKRAO KOKATE RESIGNS: अखेर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा (MANIKRAO KOKATE RESIGNS) झाला असून क्रीडा मंत्रालयाचा पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
नाशिक सदनिका गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयानं अटक वॉरंट जारी झाल्यानंतर हा राजीनामा झाला आहे.
माणिकराव कोकाटे यांचे खाते काढण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती. राज्यपालांनी ही शिफारस मान्य केली आहे.
त्यामुळे आता कोकाटे आपल्या पदावरून पायउतार झाले आहेत.
MINISTER MANIKRAO KOTATE RESIGNATION : अखेर #माणिकरावकोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली होती.
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार एखाद्या सदस्याला कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यास तो कोणत्याही अधिकृत पदावर राहण्यास अपात्र होतो.
त्यामुळे विरोधक राजीनाम्याची मागणी करत होते. मात्र आता कोकाटे यांचे खाते काढण्न्यात आले आहे. आता कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
त्यामुळे त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास त्यांची त्यांची आमदारकी वाचू शकते.