Leopard Attack Shirur: 5-Year-Old Girl Killed in Leopard Attack; Panic Grips the Area

Junnar Leopard News: जुन्नर वन विभागात आता पर्यंत 68 बिबट पकडले ; पिंजरे आणि इतर उपायाचा होतोय फायदा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

94 0

Junnar Leopard News:  वन विभागात वाढलेला बिबटयाचा प्रादुर्भाव वाढल्याने, तो कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 13 कोटी रुपये दिले.

त्यातून मोठ्या प्रमाणात पिंजरे करण्यात आले, (Junnar Leopard News)

त्या पिंजऱ्याच्या मदतीतून आता पर्यंत 68 बिबटे वन विभागाने पकडले आहेत.

MLA RAVI RANA ON LEOPARD : बिबट्याला पाळीव प्राण्यांचा दर्जा मिळाला पाहिजे

आज पर्यंत एवढ्या कमी काळात एवढे बिबटे वन विभागाने पकडल्यामुळे बिबटे आणि मनुष्य संघर्ष येत्या काळात संपविण्यासाठी

हे महत्वाचे पाऊल ठरत असल्याची भावना व्यक्त करून यात उपवन संरक्षक प्रशांत खाडे आणि महादेव मोहिते यांच्या विशेष प्रयत्न

असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधोरेखित केले.

KOLHAPUR CITY LEOPARD VIDEO: कोल्हापुरातील नागरी वस्तीत घुसलेल्या बिबट्याची FULL STORY

जुन्नर वन विभागात जुन्नर, ओतूर, शिरुर, घोडेगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण वनपरिक्षेत्राचा समावेश होतो.

बिबट हल्ल्यात सन 2025-26 या वर्षात 5 नागरिकांचा मृत्यू असून त्यांना 65 लाख रुपये, 5 नागरिक जखमी झाले असून

त्यांना 2 लाख 18 हजार 964 रुपये, 1 हजार 657 जनावरांचा मत्यू झाले असून याकरिता 1 कोटी 61 लाख 16 हजार 889 रुपये तसेच 17 हेक्टर 7 आर पीकांचे नुकसान

झाले असून 9 लाख 79 हजार 900 रुपये असे मिळून 2 कोटी 38 लाख 15 हजार 753 रुपये इतकी नुकसान भरपाई अदा करण्यात आली आहे.

जुन्नर वनविभागाकडून मानव व बिबट संघर्ष टाळण्याबरोबरच वन्यप्राणी बिबटचे व्यवस्थापन होण्याकरिता उपाययोजना करण्यात येत आहे.

सन 2020-2021 ते 2025-26 या कालावधीत 185 बिबट-बछडे पुनर्मिलन करण्यात आले आहे. गावांमध्ये वनकर्मचाऱ्यांनामार्फत

गस्त, नागरिकांचे प्रबोधन,

स्थानिक लोकांच्या सहभागातून जलद बचाव पथकांची निर्मिती, त्यांच्याकडून गस्त व प्रबोधन करण्यात येत आहे. कलापथक यांचे

माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये व

शाळांमधून सुमारे 40 कार्यक्रम करण्यात आले असून व विषय प्राविण्य असणारे श्री सौमित्र यांचे मार्फत वेगवेगळ्या 50 गावांमध्ये

विभागातील योजना तसेच बिबट

जनजागृतीचे विशेष वर्ग ग्रामपंचायत पद अधिकारी यांचे सह घेण्यात आले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यांपासून घ्यावयाच्या काळजी घेण्याबाबतचे माहिती देणारे पोस्टर्स, घडीपत्रके,

कार्यशाळा आयोजन करण्यात आले आहे. बचाव पथकाद्वारे वन्यप्राणी रेस्क्यू करण्यासाठी पथकातील सदस्य तसेच माणिकडोह बिबट

निवारा केंद्रातील पथक यांच्या समन्वयाने

वन्यप्राणी रेस्क्यू करण्याची कार्यवाही करण्यात येते. प्राथमिक बचाव पथकातील एकूण 400 सदस्य कार्यरत आहेत.

अतिसंवेदनशील गावांत 24 X 7 जनजागृती करण्यासाठी स्थानिक तरुणांच्या माध्यमातून

पिंपरखेड, न्हावरा, भीमा कोरेगाव (ता. शिरुर), आळे व नगदवाडी, जुन्न्र (ता. जुन्न्र), आणि गावडेवाडी

(ता. आंबेगाव) या ठिकाणी ‘बिबट कृती दल’ बेस कॅम्प स्थापन करण्यात आलेले आहेत. यामुळे शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील व

आंबेगाव, जुन्नरच्या पूर्व भागातील मानव-बिबट संघर्ष मागील 2 वर्षात मोठ्या प्रमाणात नियंत्रित झाला आहे.

माहे मे 2024 पासून विभागीय कार्यालय जुन्नर येथे निंयत्रण कक्ष (टोल फ्री क्रमांक 1800 3033) स्थापन आले असून 24 X 7 कार्यरत आहे, यामाध्यमातून

अतिसंवेदनशील क्षेत्राची माहिती गोळा करुन गस्तीबाबत सूचना देण्यात येते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडील मंजुरीनंतर जुलै 2024 मध्ये

संघर्षक्षेत्रातील 10 बिबट्यांचे जामनगर (गुजरात) येथील बचाव केंद्रात स्थलांतर करण्यात आले. मेंढपाळांच्या, ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेच्या

दृष्टीने त्यांना 410 सौर दिवे

व 410 लंबुंचे (टेन्ट) वाटप करण्यात आले आहेत. शिरुर व मंचर बनपरिक्षेत्रातील एकुण 50 ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला असून जुत्रर वनविभाग हा राज्यातील पहिला वनविभाग झालेला आहे.

Share This News
error: Content is protected !!