SATARA NEWS:  सातारा जिल्ह्यातील (SATARA NEWS) जावळी तालुक्यातील सावरी गावात एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर मुंबई क्राईम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 15 कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला.

SATARA NEWS: साताऱ्यात खळबळ! सावरी गावात छापा टाकून पोलिसांनी जप्त केलं 15 कोटीचं एमडी ड्रग्स

80 0

SATARA NEWS:  सातारा जिल्ह्यातील (SATARA NEWS) जावळी तालुक्यातील सावरी गावात एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या

कारखान्यावर मुंबई क्राईम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे.

या कारवाईत 15 कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला.

SANGLI MIRAJ CRIME NEWS सांगली मिरजमध्ये एकतर्फी प्रेमातून संपवलं नेमकं प्रकरण काय?
मुंबई क्राईम ब्रँच ला साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात एमडी ड्रग्स तयार केलं जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

मुंबई पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगून ही कारवाई केली आहे.

याप्रकरणी तीन बांगलादेशी कारागीर व अन्य एक अशा चौघांना ताब्यात घेतले आहे.

मुंबई पोलिसांच्या सूचनेनंतर सातारा पोलिसांचे एक

पथक उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी आहे

YAVAT POLICE NIKHIL RANDIVE: बेपत्ता पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे अखेर घरी परतले

या छाप्यात मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज, कच्चा माल आणि ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले.

हे तयार केलेलं एमडी ड्रग्स मुंबई आणि पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवलं जातं होतं..

ज्या शेडमध्ये हा संपूर्ण एम डी ड्रग्स बनवण्याचा कारखाना सुरू होता.

या शेडचे मालक गोविंद शिंदकर यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.

रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एका व्यक्तीने कामगारांसाठी शेड मागितले होते

आणि त्याच कारणासाठी हे शेड दिल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, या शेडमध्ये बेकायदेशीररित्या ड्रग्ज तयार केले जात असल्याची

कोणतीही माहिती आपल्याला नव्हती, असेही शिंदकर यांनी स्पष्ट केले.

INDIGO AIRLINE: विमानप्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नागरी उड्डाण मंत्रालयाने घेतला महत्त्वाचा निर्णय

या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली..

पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास केल्या जात असून ह्या ड्रग्स रॅकेटचे नेटवर्क,

त्यामागील प्रमुख शोधण्याचं काम मुंबई क्राईम ब्रँच करत आहे.

Share This News
error: Content is protected !!