सांताक्रुझ परिसरातील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला आग

451 0

मुंबई- सांताक्रुझ परिसरातील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र महत्वाची कागदपत्रे जळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

इमारतीला आग लागल्याचं लक्षात येताच कामगारांनी याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक विभागाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!