DHARASHIV AASHRUBA KAMBALE:  धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून.. एका नर्तकीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुणांनं नर्तकी सोबत झालेल्या वादातून स्वतःलाच संपवण्याची घटना घडली.. पाहुयात हे संपूर्ण प्रकरण काय आहे?

DHARASHIV AASHRUBA KAMBALE: नर्तकीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या विवाहित तरुणाने स्वतःला संपवलं

71 0

DHARASHIV AASHRUBA KAMBALE:  धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून..

एका नर्तकीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुणांनं नर्तकी सोबत झालेल्या वादातून

स्वतःलाच संपवण्याची घटना घडली.. पाहुयात हे संपूर्ण प्रकरण काय आहे?

DHARASHIV AASHRUBA KAMBALE: नर्तकीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या विवाहित तरुणाने स्वतःला संपवलं

बीडमध्ये, गेवराई तालुक्यातील लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी

कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमात पडल्यानंतर पूजा गायकवाड या नर्तिकेने बोलण्यास नकार दिल्याने संतप्त होऊन उपसरपचाने नर्तकीच्या घरासमोर स्वतःवर गोळी झाडून घेतली. यानंतर उपसरपंच गोविंद बर्गे यांचा जागीच मृत्यू झाला.

PCMC CRIME NEWS: पुण्यात वैष्णवी नंतर दिव्याचाही गेला जीव पतीसह सासरच्यांवर हत्येचा आरोप

. ही घटना ताजी असतानाच आता धाराशिव मध्ये ही अशीच एक धक्कादायक घटना घडली..

धाराशीव जिल्हात साई लोकनाट्य नावाचे एक कला केंद्र आहे. या कला केंद्रात 25 वर्षीय

अश्रुबा कांबळे यांचं येणं जाणं होतं.. या कला केंद्रात सारखं येणं जाणं असल्यामुळे अश्रुबा कांबळे हा एका नर्तकीच्या प्रेमात पडला..

BEED ZP PWD CERTIFICATE CASE: बीड बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात 14 शिक्षकांच निलंबन; पाहा संपूर्ण प्रकरण नेमकं काय?

विशेष म्हणजे ती नर्तकीही त्याच्यावर प्रेम करायची.. मागील पाच वर्षांपासून त्यांच्यामध्ये प्रेम संबंध होते.

विशेष म्हणजे हा अश्रुबा कांबळे हा विवाहित होता.. अनेकदा अश्रुबा आणि नर्तकी फिरायलाही जातं..

त्याच प्रमाणे अश्रूबा आणि नर्तकी 8 डिसेंबर रोजी शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते.

दोघांनही यथायोग्य देवदर्शन केले. परंतु परतत असताना अश्रूबा याला त्याच्या पत्नीचा फोन कॉल आला.

त्यानंतर पत्नीचा फोन कॉल का आला? असा जाब विचारत नर्तकी अश्रूबाला भांडली. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

BABA ADHAV: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सुरुवातीला अश्रूबाने मी आत्महत्या करेन, अशी धमकी नर्तकीला दिली. पण नर्तकीने त्याकडे दुर्लक्ष केले.

पुढे रागाच्या भरात अश्रूबा याने गळफास घेऊन आत्महत्या केली.दरम्यान,

या प्रकरणी आरोपी नर्तिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी आत्महत्येस

प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

बीड मधील गेवराई गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांनी नर्तकीच्या प्रेमात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली

हे प्रकरण ताजं असतानाच .. आता धाराशिव जिल्ह्यातही एका विवाहित व्यक्ती अश्रुबा कांबळे याने नर्तकीच्या प्रेमातून आत्महत्या केली.

. पोलिसांनी या प्रकरणातील नर्तकीला ताब्यात घेतल्या असून तिची कसून चौकशी सुरू आहे.. तिच्या चौकशीतून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते पाहणं आता महत्त्वाचा असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!