BARAMATI ED RAID: बारामती तालुक्यात आज सकाळपासून ईडीने छापेमारी सुरू केली..बारामती तालुक्यातील सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे याच्यावर जवळपास साडेतीनशे कोटींच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अपहार झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच अनुषंगाने ईडीने ही छापेमारी केली..
आज सकाळपासून बारामती तालुक्यात ED ने छापेमारी केली आहे. बारामती तालुक्यातील जळोची खताळ पट्टा आणि झारगडवाडी या गावांमध्ये ED ने छापेमारी केली. बारामती तालुक्यातील सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे याच्यावर जवळपास साडेतीनशे कोटींच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अपहार झाल्याचे गुन्हे दाखल आहेत.
त्याच्या विरोधात शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांचे पुतणे
विजय सुभाष सावंत यांनी वाघोली पोलिस ठाण्यात 7 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली.. त्यांच्या तक्रारीवरून बारामती तालुक्यातील जळोची येथील आनंद सतीश लोखंडे,सतीश बापुराव लोखंडे,विद्या आनंद लोखंडे आणि सविता सतीश लोखंडे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याशिवाय महत्त्वाचं म्हणजे आनंद लोखंडे हा रोहित पवारांचा अत्यंत निकटचा कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे. लोखंडे याने वेगवेगळ्या फार्म काढून मोठी फसवणूक केल्याचं प्रथम दर्शनी समोर येतंय.
BARAMATI ED RAID: बारामतीत रोहित पवारांच्या निकटवर्तीयावर ईडीची छापेमारी; पाहा संपूर्ण प्रकरण नेमकं काय?
शेतकऱ्यांच्या सातबारावरती पतसंस्थांचे कर्ज काढून त्यातही मोठा फ्रॉड केल्याच्या तक्रारी दाखल होत्या..
रोहित पवारांच्या मतदार संघात त्याने कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे.. शाळा बांधून देणे विद्यार्थ्यांना ड्रेस देणे अशी कामे केल्याची माहिती ही समोर येत आहे.
PALGHAR POLICE: चौकशीसाठी बोलावलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार; पाहा संपूर्ण प्रकरण नेमकं काय?