BABA ADHAV PASSED AWAY: ज्येष्ठ समाजसेवक कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांचं निधन झालं असून वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
1 जून 1930 रोजी जन्मलेले बाबा आढाव 1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम चालवली जात होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते.
बाबा आढाव यांनी तब्बल 55 वेळा तुरुंगवास भोगला होता. आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगला होता.
मागील 13 दिवसांपासून बाबा आढाव यांच्यातील पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही रुग्णालयात जाऊन बाबा आढाव यांचे भेट घेतली होती.