सातपूर गोळीबार प्रकरणातील गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना अखेर नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
नाशिक क्राइम ब्रँच युनिट-2 च्या पथकाने उत्तर प्रदेश–नेपाळ सीमेजवळील महाराजगंज परिसरातून ही कारवाई केली.गुन्हा घडल्यानंतर दोन्ही आरोपी राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांत ठिकाण बदलत पोलिसांना चकवा देत होते. बागपतजवळील बडौत येथे चाहूल लागताच दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्या धावपळीत भूषण लोंढेचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळते.तरीही दोघे पळतच राहिले आणि नेपाळ बॉर्डरजवळ त्यांनी आश्रय घेतला. मात्र नाशिक पोलिसांनी गुप्तचर यंत्रणा आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या मदतीने त्यांचा अचूक माग काढत अखेर दोघांना जेरबंद केले.