विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या करून मृतदेहासोबत फोटो काढून व्हॉट्सअपला स्टेट्स ठेवल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील कोइम्बतूरमध्ये घडली या घटनेनं प्रसारात एकचं खळबळ उडाली… पाहुयात हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे..
बालामुरुगन असं आरोपी पतीचं नाव असून तो तिरुनेलवेली येथील रहिवाशी आहे. तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे राहणाऱ्या बालामुरुगन आणि श्री प्रिया या विवाहित जोडप्याला तीन मुले होती. वैयक्तिक कारणांमुळे श्री प्रिया कोइम्बतूरमधील एका महिला वसतिगृहात राहत होती आणि पतीपासून दूर राहून काम करत होती.बालामुरुगनला संशय होता की श्री प्रियाचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध आहेत. घटनेच्या दिवशी बालामुरुगन वसतिगृहात गेला आणि तिला आपल्यासोबत येण्यास सांगू लागला. मात्र तिने स्पष्ट नकार दिल्याने दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या वादादरम्यान बालामुरुगनने लपवलेला विळा बाहेर काढला आणि तिच्यावर जोरदार हल्ला केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर, पोलीस येईपर्यंत तो मृतदेहाशेजारी बसून राहिला होता. त्यानंतर रक्ताने माखलेल्या पत्नीच्या मृतदेहासोबत सेल्फी काढला आणि तो स्टेटस म्हणून व्हाट्सअपला ठेवला.. त्यावर कॅप्शन म्हणून त्यांना विश्वासघाताची किंमत मृत्यू आहे असे लिहिलं.. या प्रकरणात रत्नापूरी पोलिसांनी आरोपी पती बालामुरुगन याला अटक केली…
या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पती बालामुरुगनला अटक केली असून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.. या प्रकरणात आणखी कुणाचा शोध आहे का? याचा पोलिस शोध घेतं आहेत… आता या प्रकरणात पोलिस तपासातून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं महत्वाचे असणार आहे..