LATUR COVID BLIND GIRL NEWS:  कोविडच्या काळात सर्वकाही बंद असताना लातूरच्या एका वसतिगृहात बेकायदेशीरपणे ठेवण्यात आलेल्या अंध मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला, आणि हे प्रकरण दडपलं गेलं.

MUMBAI WAKOLA NEWS: मुंबईत मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश! सख्ख्या मामानंच केलं नको ते कृत्य

82 0

MUMBAI WAKOLA NEWS: मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ५ वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिची तब्बल

दीड लाख रुपयांना विक्री करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं.

दिनांक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता वाकोला

पोलिस ठाण्यात 5 वर्षीय मुलीच्या अपहरणाची फिर्याद दाखल करण्यात आली.

गुन्हा अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने अत्यंत संवेदनशीलपणे पोलिसांनी

तत्काळ 7 स्वतंत्र तपास पथकं तयार केली.

तपास पथकांनी सलग दोन दिवस तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त

माहितीच्या आधारे शोध सुरू ठेवला.

तपासात मध्यरात्री 2 ते 3 या दरम्यान एक ऑटो रिक्षा, त्यातील एक पुरुष, एक महिला आणि त्यांच्यासोबत

टेहळणी करणारे दोन संशयित मोटरसायकलस्वार दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
MUMBAI WAKOLA NEWS:मुंबईत मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश! सख्ख्या मामानंच केलं नको ते कृत्य
ऑटोरिक्षाचा नंबर मिळत नसल्याने तपासात अडचणी येत होत्या.

पण पथकांनी ऑटोरिक्षाच्या वर्णनावरून सांताक्रुझ–वाकोला परिसरातून रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं.

चौकशीत या गुन्ह्याचा पहिला मोठा धागा मिळाला अपहरण मुलीच्याच मामाने, लॉरेन्स फर्नांडिसने,

आणि त्याची पत्नी मंगला जाधव हिने केल्याचं उघड झालं.

AI Morphing Cybercrime Pune: पुण्यातील बीजीएमआय गेमच्या दुष्परिणाम: एमबीए विद्यार्थिनीला एआय-मॉर्फ फोटो मार्फत ब्लॅकमेलिंग
दोन्ही आरोपींना पोलिसांनी पनवेलमधून ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

या दोन्ही आरोपींनी मुलीची विक्री करण मारुती सनस याला 90 हजार रुपयांना केली.तांत्रिक तपासाच्या

आधारे उसर्ली-बुद्रुक, नवी पनवेल येथून करण सनस याला ताब्यात घेण्यात आलं.

करण सनस याने या प्रकरणात धक्कादायक कबुली देत ही अल्पवयीन मुलगी त्याने वृंदा चव्हाण

आणि अंजली कोरगावकर या दोन महिलांना १ लाख ८० हजार रुपयांना विकली.

पनवेल येथील नर्मदा टॉवरमधील वृंदा चव्हाण हिच्या घरातून पोलिसांनी मुलीला सुखरूप बाहेर काढलं.

SAWAI GANDHARV MAHOTSAV: 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान रंगणार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

तात्काळ तिला वाकोला येथे आणून आईच्या ताब्यात देण्यात आलं.या प्रकरणात 5 जणांना पोलिसांनी अटक केली असून आणखी एका महिलेचा शोध सुरू आहे

PM KISAN YOJNA: पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता वितरीत; महाराष्ट्रातील 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 1 हजार 808 कोटी 25 लाख थेट जमा

RAMESH PARDESHI JOIN BJP: ज्याला भर बैठकीत राज ठाकरेंनी झापलं, त्यानं पक्षालाच सोडलं; मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाईचा भाजप मध्ये प्रवेश

 

Share This News
error: Content is protected !!