SAWAI GANDHARV MAHOTSAV: आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव (SAWAI GANDHARV MAHOTSAV) यंदाच्या वर्षी
बुधवार दि. १० डिसेंबर ते रविवार दि. १४ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे संपन्न होणार
असून महोत्सवात यावर्षी सादरीकरण करणाऱ्या कलाकारांच्या नावांची घोषणा आज झालेल्या पत्रकार परिषदेत
आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी केली.
यंदा महोत्सवाचे ७१ वे वर्ष असून यावर्षी निम्म्याहून
अधिक कलाकार प्रथमच आपली कला या व्यासपीठावर सादर करतील, अशी माहितीही श्रीनिवास जोशी यांनी दिली.
SAWAI GANDHARV MAHOTSAV: 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान रंगणार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव
आज झालेल्या पत्रकार परिषदेवेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त शिल्पा जोशी, शुभदा मूळगुंद, डॉ. प्रभाकर देशपांडे, आनंद भाटे हे देखील उपस्थित होते. महोत्सवाविषयी
अधिक माहिती देताना श्रीनिवास जोशी म्हणाले,
“माझे वडील भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपले गुरु सवाई गंधर्व यांच्या नावाने
सुरु केलेल्या या महोत्सवात आजवर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे.
पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
रसिक, जाणकार श्रोत्यांनी देखील
महोत्सवावर अपार प्रेम केले. यंदाच्या वर्षीही नवोदित तरीही आश्वासक, दमदार कलाकारांना या महोत्सवासारखे व्यासपीठ मिळावे,
या हेतूने दिग्गज कलाकारांसोबत नव्या दमाच्या कलाकारांचे सादरीकरण महोत्सवात होणार आहे.
विशेष म्हणजे एकूण कलाकारांच्या संख्येच्या निम्म्याहून अधिक कलाकार हे पहिल्यांदाच महोत्सवात
आपली कला सादर करतील. या प्रयत्नाद्वारे युवा कलाकारांना एक सक्षम व्यासपीठ देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत असं मत श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केलं
SINHAGAD FORT TRAFFIC NEWS: सिंहगड परिसरातील वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी