झोया शेख ठरल्या ‘Mrs. Maharashtra’ किताबाच्या मानकरी 

563 0

पुणे – इनाना प्रोडक्शन तर्फे आयोजित ‘Inanna beauty pageants’ या भव्य सौंदर्य स्पर्धेत Mrs. Maharashtra हा किताब झोया शेख यांनी पटकावला आहे. तर धनश्री कारखानिस या फस्ट रनरप आणि नयनतारा जैसवार या सेकंड रनरप ठरल्या. तसेच श्वेता कोष्टी – खरात या गोल्डन नेक च्या मानकरी ठरल्या.

इनाना प्रोडक्शन तर्फे संचालक दीप्ती सिंग आणि प्रशांत सिंग यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. ताज विवांता हॉटेल, हिंजवाडी येथे ‘Inanna beauty pageants’ ही भव्य सौंदर्य स्पर्धा झाली. यावेळी ‘Mrs. Maharashtra’ या किताबासाठी राज्याच्या विविध विभागातून एकूण 23 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. या सौंदर्य स्पर्धेतील Mrs. Maharashtra या विभागासाठी परीक्षक म्हणून अभिनेता अंकित बाटला, अभिनेत्री फ्लोरा सैनी, अभिनेत्री, मॉडेल मुग्धा गोडसे, मीनाक्षी पांगे, सचिन साळुंखे यांनी काम पाहिले.तर सहयोगी पार्टनर म्हणून वासाबी 15 ,कॅफे पीटर हे होते.

‘Mrs. Maharashtra’ स्पर्धेचा निकाल 

जोया शेख – प्रथम (1 लाख रुपये आणि इतर बक्षिसे)

धनश्री कारखानिस – फस्ट रनरअप (50 हजार रुपये आणि इतर बक्षिसे)

नयनतारा जैसवार – सेकंड रनरअप (25 हजार रुपये आणि इतर बक्षिसे)

श्वेता कोष्टी – खरात – गोल्ड विनर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!