NITIN GADKARI l NAVALE BRIDGE: मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल (NAVALE BRIDGE) परिसरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना तातडीने आणि प्राधान्याने सुरू कराव्यात, असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (NITIN GADKARI) यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत, अशी माहिती पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (MURLIDHAR MOHOL) यांनी दिली.
नवले पूल येथे नुकत्याच झालेल्या अपघातात आठ जणांचा बळी गेला होता.
PUNE NAVALE BRIDGE SPEED :नवले पूल परिसरात वेगमर्यादा ३० किमी प्रतितास
या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी बुधवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत
हा अपघात व उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर मोहोळ यांनी ही माहिती दिली.
‘नवले पुलाजवळील अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट्स’ ची
संख्या कमी करण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती गडकरी यांना दिली.
त्यानंतरही नुकत्याच झालेल्या अपघातानंतर अधिक प्रभावी व तातडीची पावले उचलण्याची गरज असल्याकडे गडकरी यांचे लक्ष वेधले.
तसेच या अपघातानंतर पुण्यात महापालिका,
पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन, पोलिस व महामार्ग प्राधिकरणासोबत घेतलेल्या बैठकांमध्ये
निश्चित झालेल्या उपाययोजनांबाबतचा अहवालही गडकरी यांच्याकडे सादर करत याबाबत
केंद्रीय स्तरावर तातडीने सूचना द्याव्यात, अशी मागणी केली,’ असे मोहोळ म्हणाले.
NAVALE BRIDGE : नवले पुलाच्या अपघाताची कारणे शोधून आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याचे निर्देश
NAVALE BRIDGE l MURLIDHAR MOHOL : नवलेपुल अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्याकरिता उपाययोजना करा