SATARA NEWS: सातारा तालुक्यातील (SATARA NEWS) निनाम पाडळी परिसरात सहा महिन्यांपूर्वी एक शेतमजूर बेपत्ता झाल्याचा प्रकार घडला होता..
पोलिसांनी तपास घेऊनही हा शेतमजूर सापडत नव्हता आणि अखेर सह महिन्यानंतर एका माजी सैनिकांने या शेतकऱ्याची हत्या करून
मृतदेह जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला..
सातारा हादरलं! शेतमजुराचा खून करत मृतदेह जाळला; माजी सैनिकाचं अमानवीय कृत्य
पाहुयात हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे.
सातारा तालुक्यातील निनाम पाडळी गावातील 43 वर्षीय शेतमजूर संभाजी बाळू शेलार हे 8 जून 2025 रोजी अचानक गायब झाले.
कुटुंबीय,ग्रामस्थ सर्वांनी शोध घेतला…
पण त्यांचा काहीच पत्ता नाही.
NASHIK NEWS:तंत्र विद्येच्या नावाखाली भोंदू बाबाचे महिलेवर अत्याचार अन् 50 लाखांची फसवणूक
बोरगाव पोलीस ठाण्यात शेतमजूर बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.
पहिल्यांदा हा साधा बेपत्ता होण्याचा प्रकार वाटत होता…
मात्र काही दिवसांतच पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली आणि या प्रकरणाचा दुसरा पैलू पुढे आला..
गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांना संशय गावातीलच 48 वर्षीय माजी सैनिक भरत उर्फ मधू रंगराव ढाणे याच्यावर आला
पोलिसांनी चौकशीसाठी भरत ढाणे याला ताब्यात घेतलं पण त्यांना गोलमाल उत्तर दिली..
मग पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच आरोपी ढाणे हा पोपटासारखा
बोलू लागला आणि त्यानं चौकशीत खुनाची कबुली दिली..
ECI | LOCAL BODY ELECTION: निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्न
आरोपींची कबुली दिली आणि जो प्रसंग सांगितला तो अंगावर काटा आणण्यासारखा होता.
आरोपीला संशय होता की संभाजी शेलार यांनी त्याच्या घरातील कपाटातून काही रक्कम चोरली.
या संशयावरून दोघांमध्ये वाद झाला या
वादातून रागाच्या भरात आरोपीने धारदार शस्त्राने संभाजी शेलार या शेतमजुरावर हल्ला केला यात
त्यांचा जागीच मृत्यू झाला.. त्यानंतर आरोपींना हा
गुन्हा लपवण्यासाठी मध्यरात्री नंतर मृतदेह घराच्या मागच्या बाजूला नेला आणि लाकडांचा
ढीग रसून मृतदेह जाळून टाकला.
आणि अवशेष आणि राख दूरच्या मोठ्या भागात फेकून पुरावा पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला..
या सर्वानंतरही ढाणे गावातच राहत होता.
कुणालाही शंका येऊ नये म्हणून आरोपी नेहमीसारखाच वागत होता.
आणि त्यामुळेच संपूर्ण गुन्हा तब्बल सहा महिने दडून राहिला.
मात्र पोलिसांच्या तपासाला मिळालेली गुप्त माहिती आणि आरोपीने दिलेल्या कबुलीनंतर हा गुन्हा उघडकीस आला.
पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करून आरोपीला अटक केली.
माजी सैनिकाने चोरीच्या संशयावरून एका शेत मजुराची धारदार शस्त्रान हत्या
करून त्याचा मृतदेह जाळून टाकला..
या धक्कादायक घटनेमुळे निनाम पाडळी
परिसरात मोठी खळबळ उडाली.
या प्रकरणात अधिकचा तपास सुरू असून कोणती
धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं महत्त्वाच असणार आहे..