NAVALE BRIDGE l MURLIDHAR MOHOL: नवले पुल (NAVALE BRIDGE) परिसरात झालेला अपघात दुर्दवी असून यापुढे या भागात अपघात रोखण्याकरिता प्रशासनाने अल्पकालिन व दीर्घकालिन कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात, ही सर्व कामे करतांना करावयाच्या कामानुसार विभागनिहाय जबाबदारी निश्चित करावी.

NAVALE BRIDGE l MURLIDHAR MOHOL : नवलेपुल अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्याकरिता उपाययोजना करा

88 0

NAVALE BRIDGE l MURLIDHAR MOHOL: नवले पुल (NAVALE BRIDGE) परिसरात झालेला अपघात दुर्दवी असून यापुढे या भागात अपघात रोखण्याकरिता प्रशासनाने अल्पकालिन व दीर्घकालिन कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात,

ही सर्व कामे करतांना करावयाच्या कामानुसार विभागनिहाय जबाबदारी निश्चित करावी.

अपघात रोखण्याच्यादृष्टीने ‘भारतीय रस्ते कॉग्रेस’च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होईल,

PUNE NAVALE BRIDGE| MURLIDHAR MOHOL: नवले पुलावरील अपघातानंतर मुरलीधर मोहोळ ‘ॲक्शन मोड’वर

याबाबत दक्षता घ्यावी, याकामी स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेवून सर्व संबंधित विभागाने समन्वयाने काम करावे,

असे निर्देश केंद्रीय नागरी व वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

नवलेपुल येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत

ते बोलत होते. यावेळी आमदार भिमराव तापकीर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त

अमितेश कुमार, पुणे महानगरपालिकेचे महानगरपालिका आयुक्त नवकिशोर राम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे,

अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे

उपायुक्त हिम्मत जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, पीएमपीएल,

महावितरण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

PUNE NAVALE BRIDGE ACCIDENT: पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात 7 जणांचा मृत्यू

केंद्रीय राज्यमंत्री श्री. मोहोळ म्हणाले, पीएमआरडीएच्यावतीने जांभूळवाडीपासून ते वारजेपर्यंत रिंगरोडचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर)

तयार करण्याचे काम सुरु असून त्या कामाला गती द्यावी. उन्नत कॅरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण झाला

असून तो मंत्रीमंडळ बैठकीसमोर मंजूरीकरिता लवकरात लवकर आणण्याची कार्यवाही करण्यात येईल.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जांभूळवाडी ते रावेत दरम्यान सेवा रस्ता, अंडरपासचे काम गतीने पूर्ण करावे, भुसंपादनाची कार्यवाही करावी,

याकरिता संबंधित यंत्रणेने आपल्याशी संबंधित विषयात प्राधिकरणाला सहकार्य करावे. वडगावपुलाचे रुंदीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे.

याकरिता केंद्र सरकारशी संबंधित विषय मार्गी लावण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल.

PUNE JAIN BORDING: अखेर पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार कायदेशीर दृष्ट्या रद्द

 

Share This News
error: Content is protected !!