JAIN BORDING LAND SALE SUSPENSION:  पुण्यातील शिवाजीनगर येथील ऐतिहासिक जैन बोर्डिंग (JAIN BORDIN) हाऊसच्या जागा विक्रीविरोधात उभ्या राहिलेल्या लढ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

PUNE JAIN BORDING: अखेर पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार कायदेशीर दृष्ट्या रद्द

46 0

दिनांक ८/१०/२०२५ रोजी शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट व गोखले एल एल पी यांच्या मधे या सार्वजनिक स्मारक ट्रस्ट ची तीन एकर भूखंड जागा २३१ कोटी रुपयांना विक्री करण्या बाबत खरेदी खत नोंदविण्यात आले होते. सदर प्रकरणी हा व्यवहार बेकायदेशीर असल्या बाबत आचार्य श्री गुप्तिनंदी जी महाराज यांच्या मार्गदर्शनखाली मोठे आंदोलन करण्यात आले. या बाबत राज्याचे धर्मदाय आयुक्त यांचे कडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असता दिनांक ४/४/२०२५ रोजी ट्रस्ट ची जागा विक्री करण्यासाठी धर्मदाय आयुक्त यांनी दिलेले आदेश दिनांक ३०/१०/२०२५ रोजी रद्द करण्यात आले होते व सदर रद्द करण्याचा आदेश अन्यवे ट्रस्ट व गोखले बिल्डर यांनी खरेदी खत दस्त रद्द व्हावे यासाठी पुणे येथील दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला असता त्यावर आज न्यायाधीश श्री एन आर गजभिये यांनी सुनावणी घेत सदर व्यवहार रद्द बातल झाल्याने खरेदी खत दस्त रद्द करणे कामी आदेश दिले. या वेळी ट्रस्ट वतीने ॲड ईशान कोलटकर व विकसक गोखले बिल्डर वतीने ॲड निश्वल आनंद यांनी कामकाज पाहिले. सकल जैन समाजाच्या वतीने ॲड अनिल पाटणी , ॲड सुकौशल जिंतूरकर , ॲड योगेश पांडे , ॲड आशिष पाटणी , श्री अण्णा पाटील , श्री चंद्रकांत पाटील , श्री आनंद कांकरिया , श्री स्वप्नील गंगवाल उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!