दिल्लीत केंद्र सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत दिल्ली स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याची घोषणा करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्फोटातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मृतांच्या नातेवाकईकांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आली. देशात राष्ट्रविरोधी घटकांचं षडयंत्र असल्याची चर्चा मंत्रिमंडळात झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं
मंत्रिमंडळाच्या या बैठकीत दिल्ली बॉम्बस्फोटाच्या चौकशीवर आणि सुरक्षा संस्थांच्या अहवालांवर चर्चा झाली. यानंतर सरकारने म्हटले की, ’10 नोव्हेंबर रोजी देशविरोधी शक्तींनी केलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा देश साक्षीदार आहे. मंत्रिमंडळाने या घटनेची अत्यंत तातडीने आणि व्यावसायिकतेने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे गुन्हेगार, साथीदार आणि त्यांच्या मागे असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांना शिक्षा दिली जाणार आहे.’